चैत्राली भगत यांनी पळून जाऊन प्रेमविवाह केला होता. त्या दोघे कोल्हापूरला पळून गेले होते. काही दिवसांनी ते घरी परत आल्यानंतर सासरच्या लोकांनी त्यांना अमान्य केले आणि माहेरच्या लोकांनीही स्वीकारले नाही. कारण त्या मुलाने नंतर लग्नाला नकार द्यायला सुरुवात केली. त्यामुळे चैत्राली यांची अवस्था “ना घर का ना घाट का” अशी झाली. त्यांना अनेक महिने घराबाहेर काढण्यात आले. कधी कधी त्यांच्या जवळ खाण्यासाठी पैसेही नसत. अशा कठीण प्रसंगात त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा होता. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पोलिस केसेस झाल्या. अनेक अडचणी आल्या. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. त्यांचा निर्धार होता — “जर मला न्याय मिळाला, तर मी हा मुलगाच स्वीकारणार; अन्यथा कोणालाही स्वीकारणार नाही.” अशा अनेक प्रसंगांना त्यांना सामोरे जावे लागले आणि खूप संघर्ष करावा लागला. या पॉडकास्टमध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामुळे तुम्ही हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की पाहा. चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा — तुम्हाला या पॉडकास्टमधून काय वाटले?